...अशी प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली ;महीला शक्तीचा रंगला उत्सव;धाबा पोलीस स्टेशनचा उपक्रम


धाबा

जागतिक महीला दिनी महीला शक्ती उत्सव चक्क पोलीस स्टेशन मध्ये रंगला. महीलांनी विविध खेळात सहभाग घेतला.गित गायन केले.संगित खुर्चि खेळात हीरहीरीने सहभाग नोंदविला. सोबतच महीलावर होणाऱ्या अत्याचारावर निडरतेने बोलल्या. जागतिक महीला दिन  उप पोलीस स्टेशन धाबा येथे सणासारखा साजरा करण्यात आला.


सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या धाबा पोलीसांनी साजरा केलेला जागतिक महीला दिन तालूक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. महीला दिनी धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूशिल धोपटे यांनी गावातील सर्व महीलांना धाबा पोलीस स्टेशन मध्ये प्राचारण केले. शेकडो महीलांची सभा रंगली. महीलावर होणाऱ्या अत्याचारावर उपस्थित महीला हीरहीरीने बोलल्या. यावेळी धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील महीलांसाठी व्हाटसप गृप बनविण्यात आला. या गृपच्या माध्यमातून  संकटात असलेल्या महीलेला काही वेळातच पोलीसांची मदत मिळणार आहे. महीलांचा सूरक्षेसाठी असलेल्या कायद्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर विविध खेळात महीलांनी सहभाग घेत खेळाचा आनंद लूटला. तर काही महीलांनी गित गायन केले. जागतिक महीला दिनी धाबा पोलीस स्टेशन मध्ये महीलांचा उत्सव रंगला होता. शुभांगी लांडे,सूलोचना नागरगोजे,कांचन गरपल्लीवार,धिरांजली चांदेकर,अर्चना झाडे,शारदा पत्तीवार आदी कार्यक्रमात उपस्थित होत्या.

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर