तेलंगानात अडकले चंद्रपूरचे मजूर ;गावकऱ्यांनी काढले गावाबाहेर;तेलंगणा सरकारने निवासाची व्यवस्था करावी;अॕड गोस्वामी यांची मागणीसिंदेवाही

चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील 20 मजूर तेलंगानात अडकले असून, या मजूरांना तेथील गावकऱ्यांनी गावाबाहेर काढले असल्यांने, हे मजूर अडचणीत आले आहे.
या मजूरांना आपल्या परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत त्यांचे जेवण आणि निवासाची सोय तेलंगाना प्रशासनाने करावी  यासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्या ॲङ पारोमिता गोस्वामी महाराष्ट्र आणि तेलंगाना प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहेत.


पवनपार, गुंजेवाही, खैरी, तांबेगडी मेंढा येथील 20 मजूर असून, ते तेलंगानातील कोट्टागुड्डम जिल्हयातील करसलबोड येथे मिरची तोडण्यासाठी हे मजूर स्थलांतरीत झाले होते.
कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन झाल्यानंतर, मिरची तोडण्याकरीता गेलेल्या या स्थलांतरीत मजूरांना करसलबोडच्या गावकऱ्यांनी गावाबाहेर काढले.  परत येण्यासाठी कोणतेही साधन नसल्यांने, हे मजूरांना गावाबाहेर शेतातच एका ताडपत्रीवर, उघडयावर राहण्याची पाळी आली.  या मजूरांना शेतमालकांनी तांदूळ दिले असले तरी, त्याचेही त्यांनी पैसे घेतल्यांने, या मजूरांकडे आता पैसेही फार राहीले नाही. पाण्यांची अडचणही असल्यांची माहीती या मजूरांनी ॲङ गोस्वामी यांना फोनवर दिली.
या मजूरांना परत गावाकडे आणणे सध्या तरी शक्य नसल्यांने, या मजूरांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था तेलंगाना प्रशासनाने करावी अशी विनंती ॲङ गोस्वामी यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक तसेच तेलंगानातील कोट्टागुड्डमचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांचेकडे केली आहे.  कोट्टागड्डमचे जिल्हाधिकारी यांचेकडे ॲङ गोस्वामी यांनी इमेल पाठवून मदतीची विनंती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर