आमदार म्हणतो " तूला काय डोक्यावर घेऊ " ; कँन्सरग्रस्त मुलीच्या वडीलाला आमदाराचे खडे बोल ;आॕडिओ क्लिप वायरलराजुरा :

कॅन्सरने आजारी असलेल्या आपल्या मुलीला उपचाराकरिता धनंजय फलके यांनी मुंबई रुग्णालयात दाखल केले. उपचार चालू असेपर्यंत मुंबई येथील आमदार निवासात किंवा इतरत्र राहण्याकरिता जागा मिळवून देण्याची त्यांनी राजुऱ्याचा आमदारांना विनवणी केली.मदतीचा हात आमदारांनी दिला नाहीच उलट अर्वाच्य भाषेत  खडेबोल सूनावले.   शिवीगाळ केल्याचा ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे.

गोंडपीपरी तालुक्यातील धनंजय फलके यांची मुलगी कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहे. मुलीच्या उपचारासाठी ते मुंबईला गेले. राजुरा येथील आमदारांना मुंबई येथे आमदार निवासात राहण्याची सोय करून द्यावी अशी विनंती त्यांनी आमदारांना केली.  मात्र आमदारांकडून मदतीचा हात मिळाला नाही उलट आमदाराने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मी फुटपाथवर आहे असे फलकेंनी आमदारांना सांगितले तेव्हा आमदारांनी मग काय तूला डोक्यावर घेऊ असे उद्धट बोल सूनावले. आमदार आणि फलके यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर