14 वर्षाचा वनवास संपला...अन अर्धवट बंधारा पुर्ण झाला ;चार आमदारांचा कार्यकाळ लागला पणाला


 राजूरा

" शासनाचे काम लांबच लांब " असे ग्रामीण भागात उपहासाने बोलले जाते.याचा प्रत्यय राजूरा तालूक्यात बघायला मिळत आहे.  एका साध्या बंधार्याचा बांधकाम पुर्णत्वास जाण्यासाठी तब्बल चौदा वर्षाची प्रतिक्षा करावी लागली. बरे एक नव्हे दोन नव्हे चक्क चार आमदारांनी सत्ता गाजविली मात्र बंधारा उपेक्षित राहीला . अखेर चौदा वर्षानंतर शासनाला जाग आली अन अर्धवट बंधारा नजरेस पडला.बंधार्याचा बांधकामासाठी 67 लाखाचा निधी मजूंर झाला असून बंधार्याचा निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर आहे.

 राजूरा तालूक्यातील गोवरी येथिल नाल्यावर सन 2006 मध्ये बंधार्याचे बांधकाम मंजूर झाले. बांधकामाला सूरवात झाली. अर्धवट बांधकामानंतर निधी अभावी बांधकाम रखळले. अर्धवट बांधकाम झालेला हा बंधारा मागिल चौदा वर्षापासून जैसे थे उभा आहे.  या चौदा वर्षात राजूरा विधानसभा क्षेत्रात चार आमदारांनी सत्ता भोगली. मात्र एकाही आमदाराला हा अर्धवट बंधार दिसला नाही.आता मात्र प्रशासनाची नजर या बंधार्यावर पडली आहे.  बंधाऱ्याचा सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे.  बंधाऱ्याच्या कामासाठी 67 लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे. या बंधार्याचा कामाला आता सूरवात झाली आहे.

चार आमदार...एक बंधारा

राजूरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधार्याला मंजुरी मिळाली. माजी आमदार अॕड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. तर आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. बांधकाम अर्धवट झाले अन निधीमुळे रखळले.  माजी आमदार अॕड. संजय धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीस मंजुरी मिळाली. अर्धवट बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामासाठी लघु सिंचाई विभागाने 67 लाखाचा अंदाजपत्रक तयार केला होता व शासनाकडे सादर करण्यात आला. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कामाचे भूमिपूजनही आटोपण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments