आदिवासी विद्यार्थी संघाचा मदतीचा ओघ सूरुच ;दुसरा टप्पात 17 गावातील गरजूंना मदत


सिताराम मडावी


पाटण :- जिवती तालुक्यातील अतिशयदुर्गम बहुल ग्रामीण भागातील  गरजू व्यक्तींसाठी आदिवासी विद्यार्थी संघ 'एक हात मदतीचा' हा उपक्रम राबविला आहे. निराधार महिला,पुरुष, अंध, मुखबंधीर, अपंग गरजूंना जपली माणुसकी एक हात मदतीचा या उपक्रमाचा वितरण  जी.एस.तिवारी ठाणेदार पो.स्टे.भारी ता.जिवती यांच्या उपस्थितीत  जिवती तालुक्यातील १७ गावांमध्ये १५ मे रोजी दुसऱ्या वितरणाचा टप्प्पा संपन्न झाला आहे.या उपक्रमात जिवती व कोरपना तालुक्यातील सहयोगी मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती व
पाहंदी पारी कुपार लिंगो माथाफाटा, वीर बाबुराव शेडमाके समिती कोरपनाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होते.
गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी
आदिवासी विद्यार्थी संघ, शाखा- चंद्रपूर देखील गरजू व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात विद्यार्थी प्रतिनिधी यांनी संकल्पना मांडली.  सामजिक समिती यांच्या बरोबर संपर्क साधून कोरपना, जिवती तालुक्यातील निराधार विधवा पुरुष, महिला, अपंग असे अतिशय गरजू व्यक्तींसाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली. त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघ, चंद्रपूर एक हात मदतीचा उपक्रम तयार करण्यात आली.
 शिक्षकवर्ग,वनाधिकारी,डॉ, पोलीस कर्मचाऱ्यांच्या, राजकीय, व्यापारी यांचा सहयोगातून 'एक हात मदतीचा' या उपक्रमाने राबविण्यात आला.
 शिक्षकवर्ग, वनाधिकारी,पोलीस कर्मचाऱ्यांनी यांनी
तांदूळ, तूर दाळ, तेल, साबण, साखर, चहापत्ती, मिरची पावडर, हळद, मास्क, पार्ले-जी बिस्कीट, रक्कम स्वरूपात आणि इतर आवश्यक वस्तू आदी साहित्य या उपक्रमासाठी देण्याचे आव्हान कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आविस.चंद्रपूर यांनी केले आहे. या उपक्रमाची सुरुवात 8 मे रोजी  पासून करण्यात आला आहे.
जमा झालेले  रक्कम व जीवनावश्यक इतर किट तयार करून त्याच्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची जबाबदारी संजूजी सोयाम, कंटू कोटनाके, प्रा.लक्ष्मण मंगाम,  मंगेश गेडाम, पंकज सिडाम, सिताराम मडावी सर्वजण मिळून जबाबदारी घेतली आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे आदिवासी बहुल भागामध्ये आदिवासी निराधार विधवा पुरुष, महिला, अपंग असे
व्यक्तीकडे कोणाचा काम नाही. सध्या जगभरात कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून अद्यापर्यंत देशभरात अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा पोहचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि देशातील नागरिक घराबाहेर पडू नये. परंतु काही दिवसांपासून देशभर कोरोना रूग्णाचे प्रमाण वाढले असल्यामुळे पर्यायाने महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.या लॉकडाऊनचा सर्वाधित फटका हा दररोज काम करून आपली उपजिवीका भागविणार्‍या कामगार शेतमजूर, निराधार व्यक्ती तसेच इतर कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.हाताला काम नसल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू संपत चालल्या आहेत आणि खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेकांवर मोठे संकट कोसळले आहे.

आदिवासी विधवा महिला, पुरुष, अपंग, अंध, मुखबंधीर लोकांची उपश मरीची वेळ येऊ नाही  यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ व सामाजिक समिती प्रयत्नशील आहे.
अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था आदिंना मदतीसाठी आव्हान करण्यात आले आहे.
आदिवासी विद्यार्थी संघ एक हात मदतीचा या माध्यमातून करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद  शिक्षकवर्ग,वनाधिकारी, डॉ. पोलीस कर्मचारी, सामजिक समित्या, वीर बाबुराब पुललेश्वर शेडमाके समिती आवळापूर यांनी रक्कम स्वरूपात मदत दिले आहेत.
यामध्ये पहिला टप्यात कोरपना तालुक्यातील 13 गावातील गरजूंना जीवनावश्‍यक वस्तुंचा किटचे वाटप तर
दुसऱ्या टप्प्यात जिवती तालुक्यातील 17 गावातील गरजूंना जीवनावश्‍यक वस्तुंचा किटचे वाटप करण्यात आला आहे. अजून तिसऱ्या टप्प्याच्या वाटप सुध्दा लवकरच सुरुवात करणारा आहो.
याप्रसंगी जि.एस.तिवारी ठाणेदार, कंटू कोटनाके आ.वि.स, प्रा. लक्ष्मण मंगाम मु.ए.सं.स, संजूजी सोयाम,प.कु.लिं.स, पंकज सिडाम आ.वि.स, सिताराम मडावी मु.ए.सं.स, सत्तरशाह कोटनाके मु.ए.सं.स, अमृतराव आत्राम, मलकू कोटनाके,बंडूजी कुमरे माजी सैनिकप.कु.लिं.स, चंदू कोटनाक सर, आदी उपस्थित होते.
 वितरणाचे नियोजन आदिवासी विद्यार्थी संघ, शाखा-चंद्रपूर, मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती, पाहंदी पारी कुपार लिंगो माथाफाटा.वीर बाबुराव शेडमाके समिती कोरपना या समितीचे टीम करत आहे.

Post a Comment

0 Comments