वाळूची वाहतूक करणारा ट्रक्टर पलटी;दोन मजूर ठार;दोन जखमी;कोरपना तालूक्यातील घटना


कोरपना

वाळू वाहतूक करणारा ट्रक्टर पलटून दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेत. ही घटना कोरपना तालूक्यातील तूळशी-जेवरा मार्गावर आज ( गुरुवार ) पहाटेला तिन वाजताचा दरम्यान घडली. अनिल परचाके,देवराव नैताम असे मृतकांची नावे आहेत.जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कोरपणा तालूक्यात राजरोषपणे वाळू तस्करी सूरु आहे. तस्करांना महसूल विभाग पोटाशी घेत असल्याचा आरोप होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कोरपना तालूक्यात वाळू तस्करीला उधाण आले आहे.
पैनगंगा-वर्धा नदीतील पात्रातून चोरमार्गाने वाळू तस्करी सूरु आहे. वाळू वाहतूक करणारे वाहने रात्रौ-बेरात्र धावत असतात. आज ( गुरुवार ) पहाटे तिन वाजताचा दरम्यान तांबाडी  घाटातून MH 34 L 9458 क्रमांकाची ट्रक्टर वाळूचा भरणा करुन तूळशी-जेवरा मार्गाने निघाली. ट्रक्टरवर धानोली तांडा गावातील अनिल परचाके,देवराव नैताम,रामराव परचाके,शंभु मडावी हे चार मजूर होते. चालकाचे ट्रक्टरवरील नियंत्रण सूटल्याने ट्रक्टर पलटी झाली.ट्रक्टरखाली दबल्याने अनिल परचाके,देवराव नैताम या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रामराव परचाके,शंभू मडावी हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली.जखमीना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.पलटी झालेला ट्रक्टर कोरपना नगर परिषदेतील नगरसेवकाचा मालकीचा असल्याची माहीती आहे. या घटनेमुळे धानोली तांडा गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments