सौर कुंपनाला धडक ; दूचाकी खाक


    चिमूर


चिमुर तालुक्यातील सावरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्या करीता राहुल मेश्राम लाईनमन गेले .विद्युत डीपी गावातील तुळशीराम आवारी यांच्या शेतात असल्याने दुचाकीने १० .३० च्या दरम्यान जात असताना सौर कुंपनाला धडक दिली .ज्यामूळे त्यांचा तोल जाऊन प्रेट्रोल लीक होऊन दुचाकी पेटायला लागली. लाईनमनने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली मात्र दुचाकीची राख झाली .
       चिमूर तालुक्यात तिन दिवसापुर्वी आलेल्या चक्रीवादळामूळे सावरी व परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झालेला होता. ह्याची तक्रार विद्युत पुरवठा व वितरण विभागाला करण्यात आली होती . त्याप्रमाणे विद्युत पुरवठा दुरूस्तिकरीता लाईनमन राहुल मेश्राम सावरी येथे आले .विद्युत पुरवठा करणारी डीपी गावातीलच तुळशिराम आवारी यांच्या शेतात असल्याने दुचाकीने मेश्राम निघाले होते .आवारी यांनी शेतात भाजीपाल्याची लागवड केली आहे .परिसरात जंगली प्राण्यांचा सदैव हैदोस असल्याने यापासुन पिकांचे संरक्षण करण्या करीता त्यांनी शेताला सौर कुंपन केलेले आहे .
       लाईनमन आवारी यांचे शेतात लगबगीने विद्युत पुरवठा दुरूस्ति करीता निघाल्याने त्यांना सौर कुंपनाचा विसर पडला व सरळ कुंपनावरच त्यांनी धडक दिली .ज्यामूळे त्यांचा तोल जाऊन दुचाकीसह ते पडले त्यामूळे पेट्रोल लिक होऊन तिने पेट घेतला .हे पाहताच मेश्राम त्वरीत दुचाकी पासुन दुर पडाले .त्यामूळे ते थोडक्यात बचावले मात्र त्यांची दुचाकी जडून राख झाली .हे दृष्य पाहून परिसरातील शेतकरी व नागरीक गोळा झाले .या दुर्घटनेत  कोणतीही जिवित हानी झाली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर