अपघातात एक ठार ,एक जखमी ;कोरपना तालूक्यातील घटनाकोरपना


 दुचाकी वाहनाचा झालेल्या अपघातात एक ठार ,एक जखमी झाल्याची घटना कोरपना-आदीलाबाद मार्गावर आज ( बुधवार ) दूपारचा सूमारास घडली.प्रकाश बाबुराव जूमनाके असे मृतकाचे नाव आहे.गंभीर जखमी असलेल्या सूरज दौलत सिडाम याला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रकाश बापूराव जुमनाके ( २२ वर्ष )  सुरज दौलत सिडाम (२२ वर्ष ) हे दोघे लग्नासाठी मानोली गावावरुन वरून रूपापेठला निघाले होते. दरम्यान पारडी जवळ त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सूटले. मार्गालगत असलेल्या गिट्टीच्या ढीगावर दूचाकी आढळली. यात प्रकाश बाबूराव जूमनाके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला सूरज दौलत सिडाम हा गंभीररीत्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अरुण गुरनुले ,पोलीस कर्मचारी अशोक मडावी, साईनाथ जायभाये घटनास्थळी पोहचले. जखमी रुग्णाला कोरपणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला  चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
 पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे

Post a Comment

0 Comments