अस्वलांचा हल्यात दोघे जखमी ; गोंडपिपरी तालूक्यातील घटना



गोंडपिपरी

 तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर अस्वलीने हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाल्याचा दोन घटना गोंडपिपरी तालूक्यात घडल्या आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजूरात दहशत पसरली आहे.

गोंडपिपरी तालूक्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सूरु झाले आहे. तालूक्यातील सरांडी गावातील निलकंठ बावणे हे एफडीसीएम वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक 36 तेंदूसंकलन करित होते. अचानक अस्वलाने हल्ला केला. सहकार्यांनी अस्वलाला पळवून लावल्याने जिव वाचला. जखमी अवस्थेत बावणे यांना तोहोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. दूसर्या घटनेत वेजगाव येथील मारोती देवगडे हे अस्वलाचा हल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Post a Comment

0 Comments