संतापजनक...! अपंगाचा निधीतून घर टॕक्स कपातधाबा ग्रामपंचायतीचा असंवेदशीलपणा

गोंडपिपरी

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देश टाळेबंद झाला. टाळेबंदीत बँकेची ईऐमआय,विद्यूत देयकाची वसूली न करण्याचा निर्णय सरकारने घेतला. जनधनचा खात्यात पाचशे रुपयाची मदत सरकारने टाकली.सामान्य नागरिकांच्या मदतीला सरकार हात पुढे करित असतांनाच धाबा ग्रामपंचायतेने मात्र असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या निधीतून चक्क घर टॕक्सची वसूली ग्रामपंचायतेने केली. या संतापजनक प्रकारावर सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामपंचायत धाबा अंतर्गत एकूण 24 दिव्यांगाची नोंद आहे. या  ग्रामपंचायतेचा एकूण उत्पनातील पाच टक्के रक्कम ग्रामपंचायतेचा अपंग निधीतून दिव्यांगाना दिली  जाते.मागिल सत्रात ग्रामपंचायतेने दिव्यांगाना आनुदानाचे वाटप केले नव्हते. त्यामुळे दोन वर्षाचा अनुदान ग्रामपंचायतेने दिव्यांगाना दिला. एका दिव्यांगाला दोन हजार रुपयाचे अनुदान द्यायचे होते. मात्र दिव्यांगाचा हातात केवळ हजार रुपये ठेवण्यात आले तर उर्वरित हजार रुपयातून घर टॕक्स कपात करण्यात आला. या प्रकारावर दिव्यांगाचे आई-वडील चांगलेच भडकले मात्र त्यांचे काही ऐक न ऐकता ग्रामपंचायतेने घर टॕक्स कपात केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश्यात लाॕकडाऊन सूरु आहे. राज्याचा,जिल्हाचा सिमा सिल करण्यात आल्या.धावणारे जग थांबले. उद्योग बंद झालेत. नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळले. कामगार,मजूरांचा हातांना रोजगार नसल्याने खाण्यापिण्याचेही वांदे झाले होते.अश्या बिकट स्थितीत सरकारने मदतीचा हात पुढे केला.बँकेची ईएमआय,विद्यूत देयकाची वसूली न करण्याचा आदेश काढला. गरिबांना मोफत अन्नदान्य दिले. दूसरीकडे दिड महीणा स्वताला घरात टाळेबंद केलेल्या गरिब दिव्यांगाचा निधीतून धाबा ग्रामपंचायतेने घर टॕक्सची वसूली केली.या प्रकारावर ग्रामपंचायतेचा संवेदना बोचट झाल्याचा तिखट प्रतिक्रिया संतनगरीत उमटत आहेत.

ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगाना अपंग निधीतून दोन हजाराचे अनुदान देण्यात आले. त्यापैकी काहीं दिव्यांगाचा अनुदान रक्कमेतून घर टॕक्स कपात करण्यात आला. त्यांचा सहमतीनेच टॕक्सची रक्कम वसूल करण्यात आली.

किर्तीमंत मंगर ,ग्रामविकास अधिकारी,धाबा


टाळेबंदीत गरीब,कामगार,मजूरांना शाशन,प्रशासन मदतीचा हात समोर करित असतांना ग्रामपंचायतेने दिव्यांगाचा अनुदानातून ग्रामपंचायतेची वसूली केली आहे.हा प्रकार संतापजनक आहे.धाबा ग्रामपंचायतेने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे.

नामदेव सांगडे,माजी सरपंच,धाबा

Post a Comment

0 Comments