भाजपाच्या महिला नेत्यानी वाढदिवसा निमित्य गरिबांना केले धान्य किट चा वाटप


गडचांदूर

संपूर्ण जगात कोरोना वायरसनी जणू धुमाकूळ घातला असून त्यात आपला देश व आपले राज्य सुद्धा सुटले नाही. त्यामुळे भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी तात्काळ संपूर्ण देश लॉक डाऊन केले.त्यामुळे  कुणालाही घराबाहेर निघता आले नाही.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या  हाताला रोजगार उरला नाही.पोट भरण्यास  धान्य उरले नाही.खिश्यात पैसा उरला नाही. अशातच गडचांदूर येथील भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या मा. सौ. रंजनाताई डाँ. सुधाकर मडावी यांचा आज दि.११/५/२०२० रोजी  वाढदिवस होता.
तेव्हा त्यांनी कुठलाही खर्च न करता गरीब,गरजू लोकांना धान्य किट चे वाटप केले.त्यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार,युवा
नेते निलेशजी ताजने,भाजपा महामंत्री हरिभाऊ घोरे,नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे ,संदीपजी शेरकी आदी उपस्थित होते.यांच्या या उत्तम उपक्रमा बद्दल सर्वनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments