महाराष्ट्र-तेलंगणाचा सिमेवर " लालपरी "


गोंडपिपरी

तेलंगणात अडकलेले मजूर पोडसा सिमेवरुन चंद्रपूर जिल्ह्याचा सिमेत पाय ठेवित आहेत. हजारो मजूरांनी पोडसा सिमेवरुन स्वगाव गाठले आहे. मात्र अद्यापही मजूरांचे येणे सूरुच आहे. या मजूरांसाठी दोन दिवसापासून  लालपरी धावत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येने तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेले होते. देश्यात लाॕकडाऊन सूरु झाल्याने हजारो मजूर तेलंगणात अडकून पडले होते. तब्बल दिड महीण्यांनी तेलंगणात अडकून पडलेल्या हजारो मजूरांनी पोडसा सिमा गाठली. तिन दिवस मोठ्या संख्येने मजूरांचा ओघ सूरु होता.एकाच वेळी हजारो मजूर धडकल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. पोडसा सिमेवर आलेल्या  मजूरांना खाजगी वाहनानी गावोगावी पोहचविण्यात आले. अजूनही थोळ्याफार प्रमाणात मजूर पोडसा सिमेवर येत आहेत.मजूरांची गैरसोय टाळण्यासाठी सिमेवर एसटी बसेस धावत आहेत.मागील दोन दिवसापासून बसेस सूरु आहेत.

Post a Comment

0 Comments