गरजूंना मदत ;आदिवासी विद्यार्थी संघाचा पुढाकारकोरपना तालुक्यातील १३ गावातील गरजु लोकांच्या मदतीला धावुन गरजूंना जीवनावश्यक कीटचे वाटप!

सिताराम मडावी/पाटण

 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत असून हातावर पोट असलेल्या निराधार, विधवा, महिला, पुरुष, अपंग वर्गासह गोरगरीबांचे मोठे हाल होत आहेत. ही परिस्थिती पाहता आदिवासी विद्यार्थी संघ व सहयोगी पहांदीपारी कूपार लिंगो उत्सव देवस्थान समिती माथा- देवघाट व मूळनिवासी एकता संघर्ष समिती,जिवती. वीर  बापूराव शेडमाके समिती कोरपना या गरजु व गरीब लोकांच्या मदतीला धावून त्यांनी आपल्या

 कोरपना तालुक्यात जीवनावश्यक साहित्य व रेशन किट वाटप करण्यात आले आहे.
जगभरात कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून अद्यापर्यंत देशभरात अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा पोहचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि देशातील नागरिक घराबाहेर पडू नये. परंतु काही दिवसांपासून देशभर कोरोना रूग्णाचे प्रमाण वाढले असल्यामुळे पर्यायाने महाराष्ट्रात १७ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.या लॉकडाऊनचा सर्वाधित फटका हा दररोज काम करून आपली उपजिवीका भागविणार्‍या निराधार विधवा पुरुष, महिला, अपंग वर्ग तसेच इतर कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फटाका बसला आहे.हाताला काम नसल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू संपत चालल्या आहेत आणि खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेकांवर मोठे संकट कोसळले आहे.

आदीवासी विद्यार्थ्यांना आपल्या समाजाची जाण निराधार,अपंग,गरजुना दिला मदतीचा हात
कॉरोना च्या विख्याळ्यात पूर्ण महाराष्ट्र ऐकतेने झुंज देतोय त्यात  अतिदुर्गम भागातील आदीवासी समाज,निराधार, अपंग,अश्या अनेकांचे हाल होत आहे. याचा विचार करून आदिवासी समाजातील काही विद्यार्थी एकत्र येऊन आदीवासी समाजातील अत्यंत गरजू  (११०) एकशे दहा कुटुंबाला आज घरगुती अत्यावश्यक सामग्री पुरवली.मा.रुपाली संजय तोडासे सभापती  पं.स कोरपना याचा उपस्थित मध्ये पहिल्या टप्प्यात कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिंगारपठार,कमलापूर,थिप्पा,
शिवापूर,उमरहिरा,जांभूळधरा,
खडकी,रूपापेठ,मांगलहिरा, टांगळा या गावांना किटचे वितरण करण्यात आले. या वेळी  आदिवासी विद्यार्थी संघ शाखा,चंद्रपूर व मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती
पाहंदी पारी कुपार लिंगो माथाफाटा .
वीर बाबुराव शेडमाके समिती कोरपना संघटनेचे पदाधिकारी यांनी किटचे वितरणाच्या उपक्रम मध्ये संजय सोयाम, कंटू कोटनाके, प्रा.लक्ष्मण मंगाम, मंगेश गेडाम, पंजक सिडाम, कुमरेजी मेजर (माजी सैनिक), विलास गेडाम,ईश्वर मेश्राम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 तालुक्यातील निराधार वर्गाला दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी सामजिक संस्थाही हे पुढे सरसावले असून ते एक हात मदतीचे आव्हान करून आदिवासी समाजातील कर्मचारी शासकीय, निमशासकीय, व्यापारी, इतर मदतीने सामाजिक समिती जीवनावश्यक साहित्याचे किट वाटपाचा उपक्रम हाती घेऊन राबवत आहेत.अद्यापर्यंत तालुक्यात गरजूपर्यंत त्यांची मदत पोहचली असून अद्यापही हे मदतकार्य सुरूच आहे. तालुक्यातील निराधार व्यक्ती उपाशी राहणार नाही या उद्देशाने अनेक आदिवासी विद्यार्थी संघ शाखा, चंद्रपूर व मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती
पाहंदी पारी कुपार लिंगो माथाफाटा. वीर बाबुराव शेडमाके समितीच्या हे प्रयत्न करत आहेत.

Post a Comment

0 Comments