चोरबीटीचा तस्करावर पोलीसांची नजर गोंडपिपरी

 खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. पेरणीची वेळ अगदी जवळ आली असतांना बळीराजा " चोरांचा " प्रतिक्षेत आहे. राज्यात बंदी असलेले चोरबीटी या  कापसाचा वाणाची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पेरणी केली जाते.लाॕकडाऊनमध्ये राज्याचा सिमा सिल आहेत. अश्यात चोरबिटीला घेऊन बळीराजा चिंतेत आहे. तर लपून छपून येणाऱ्या चोरबीटीवर पोलीसांची करडी नजर आहे. गोंडपिपरी पोलीसांनी चोरबिटीची तस्करी करणाऱ्या चोरांना ताब्यात घेतले आहे. एकीकडे चोरांचा प्रतिक्षेत बळीराजा आहे तर दूसरीकडे तस्करांना जेरबंद करण्यासाठी पोलीस टपले असल्याचे चित्र गोंडपिपरी तालूक्यात आहे.

राज्यात बंदी असलेल्या चोरबिटी या कपाशीचा वाणाला गोंडपिपरी तालूक्यात मोठी मागणी आहे. चोरबिटी कपाशीचा पिकावर तणानाशकाची फवारणी केली असता तण जळून खाक होत असते मात्र कपाशीचे झाड करपत नाही.मजूर लावून शेतातील तण काढण्यासाठी  मोठा खर्च येत असतो.  त्यामुळे कपाशीचे पिक घेणाऱ्या  शेतकर्यांत चोरबिटीची मोठी मागणी असते. मिळेल त्या भावाने चोरबिटीची खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करित असतात. चोरबिटीचा तस्करीत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. व्यवसायात मोठा नफा असल्याने अनेकांनी या व्यवसायात पाय पसरविले आहे. परराज्यातून कमी दरात चोरबिटी वाणाची खरेदी करुन जिल्ह्यातील शेतकर्यांना जादा दरात चोरबिटीची विक्री केल्या जाते. एकीकडे शेतकरी चोरबिटीचा प्रतिक्षेत असतांना दूसरीकडे कृषी विभाग,पोलीस विभाग तस्करांवर नजर ठेवून आहेत. नुकतेच गोंडपिपरी पोलीसांनी चोरबिटीची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.तर एक आरोपी फरार झाला आहे.गोंडपिपरी तालूक्याला लागुन असलेल्या तेलंगणा राज्यातून चोरबिटी बियाणाची तस्करी  करित असल्याची माहीती गोंडपिपरी पोलीसांना मिळाली.गोंडपिपरीचे ठाणेदार संदिप धोबे यांनी सापडा रचून तिन तस्करांना ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरबिटीचा 40 पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.तर मुख्य आरोपी फरार आहे.
टाळेबंदीत राज्याचा,जिल्हाचा सिमा सिल करण्यात आल्या आहेत. चोरबिटी तेलंगणातून जिल्ह्यात आणली जाते. टाळेबंदीत राज्याची सिमा ओलांडून जाणे मोठी रिस्क असतांनाही चोरबिटीची तस्करी करण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धा दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments