अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या खासदार धानोरकर यांची जिल्हाधिका-यांकडे मागणीचंद्रपूर

 शहरातील बुदाई दफाई वस्ती, अष्टभुजा वॉर्ड, महाकाली कॉलरीतील अनेकांनी रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेकडो नागरिक वास्तव्यास आहे. आता या जागेवर घर करून राहणा-यांना तातडीने जागा खाली करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा मिळेपर्यंत त्यांना वेळ द्यावा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
बुदाई दफाई वस्ती, अष्टभुजा वॉर्ड, महाकाली कॉलरीतून रेल्वेची लाइन गेली आहे. या लाइनच्या जागेवर अनेकांनी आपली घरे बांधली आहेत. हे अतिक्रमणधारक ४० ते ४५ वर्षांपासून राहत आहेत. महापालिका त्यांच्याकडून पाणी, गृहकर आकारते. या जागेवरून रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचा प्रस्ताव होता. त्याअनुशंगाने आता काम सुरू होणार आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून रेल्वेलाइनच्या जागेवर घर करून राहणा-या अतिक्रमणधारकांना जागा खाली करण्यासाठी दबाब टाकण्यात येत आहे. त्यांना कोणतीही नोटीस, सूचना न देता घरे खाली करण्याबाबत सांगण्यात आले. त्यामुळे या भागातील रहिवासी संकटात सापडले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. या स्थितीत त्यांची पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत त्यांना वेळ देण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments