निराधार भावंडांना आभाळमाया देणारे नगराध्यक्ष अरुण धोटे

वादळात उडालेल्या घराला पुन्हा सावरले....

राजूरा

निवांतपणे खेळण्या बाळगण्याच्या दिवसातच आई वडिलांचे छत्र हरपले आणि आयुष्याच्या खडतर प्रवासात सर्वकाही आधार हरवलेल्या दोन भावांना भविष्यातील मार्ग दिसेनासा झाला. अठराविश्व दारिद्र्यत जन्मलेल्या भावंडासमोर संकटकाळात नातीही जवळ आली नाहीत. ना घर , ना दार अशा अवस्थेत जगण्याचा प्रश्न असताना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी निराधार दोन्ही भावंडांना मायेची ऊब दिली आणि जगण्याचं बळ दिलं. शारदा आणि रामचंद्र विठ्ठल विधाते या दोन्ही भावंडांचा जीवन संघर्ष नियतीला हार न मानता पुन्हा सुरू झाला.

 दोन दिवसापूर्वी झालेल्या तुफानी वादळात पुन्हा घर उद्ध्वस्त झाले मात्र याची माहिती मिळताच नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी तात्काळ घराची दुरुस्ती करून दिली व व मानवतेचा परिचय दिला. संकटकाळात रक्ताचे नाते ही दुरावतात.  मात्र जिसका कोई नही, उसका खुदा है यारो या गीता प्रमाणे संकट काळातही निराधार भावंडांना मायेची सावली नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी दिली व भावंडांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.सहा वर्षापूर्वी अनाथ झालेल्या या भावांना घरकुल योजनेअंतर्गत नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी घर मंजूर केलं. बालवयात कोसळलेले संकटातून जगण्याचा आधार मिळावा यासाठी अन्नधान्याची व्यवस्था केली. मागील सहा वर्षापासून भावांना दरमहा पाचशे रुपये स्वतः अरुण धोटे खर्च पाण्यासाठी देत आहेत. बहीण शारदा व रामचंद्र यांचे बालपणी  छत्र हरवल्यामुळे निराधार झालेल्या भावंडांना मदतीचा हात देण्यासाठी सकाळ व तनिष्का'च्या माध्यमातूनही पाठपुरावा करण्यात आलेला होता. यावेळी अनेक दात्यांनी या भावांना वेगवेगळ्या रूपाने आर्थिक मदत केलेली होती.  जगण्यासाठी धिर दिलेला होता. सकाळच्या माध्यमातून नगराध्यक्ष अरुण धोटे यांनीही भावंडांचे भविष्य सुरक्षित राहावे या दृष्टीने व्यवस्था केली. भाऊ हा दिव्यांग असल्यामुळे त्याची काळजी घेत एकमेकाला आधार देत दोघेही भावंडं आयुष्याचा रेटा पुढे नेत आहेत.  अचानक दोन दिवसापूर्वी तुफान वादळी पाऊस झाला अनेक झाडे कोलमडली घराचे छते उडाली. यात या निराधार भावंडांच्या घराचे ही छत उडाले .कुणीही आधार नसल्यामुळे घराला सावरायचा कसा यक्षप्रश्न निर्माण झाला .मात्र या घटनेची माहिती नगराध्यक्ष अरुण धोटे यांना मिळाली आणि तात्काळ निराधार भावांच्या घरी भेट दिली. घराची दुरुस्ती करून दिली व जगण्यासाठी बळ दिलं. निराधार भावांना मिळालेला हा मायेचा आसरा सुखावून गेला.
संकट काळात नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श समाजासमोर दिला.

Post a Comment

0 Comments