आमदार धोटेंच्या हस्ते अहेरी येथे जलसंधारण कामाचे शुभारंभ.१६७ लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार लाभ.

राजुरा

 तालुक्यातील मौजा अहेरी येथे मृदा व जल संधारण कामाचे शुभारंभ मा. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. मृदा व जलसंधारण अंतर्गत ढाळीचे बांधबंदिस्ती कामाचे शुभारंभ करण्याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांशी हितगुज साधला, ते म्हणाले की आपल्या शेतात ढाळीचे बांधबंदिस्ती करून आपल्या शेतातील मृदा वाहून जाणार नाही यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की यामुळे शेतीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. आणि उत्पादन चांगले होण्यास मदत होते.
        या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या हस्ते आमदार धोटे यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच अहेरी येथील सरपंच विठाबाई मडावी यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक  योजने अंतर्गत धाळीचे बांधबंदिस्तीचे लाभार्थी निर्धारित सांख्य १६७ असून क्षेत्रफळ २४७.३७ हेक्टर एवढ्या शेतीचे कामे कृषी विभागामार्फत होणार आहेत. अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिली.
        या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी जी.डी. मोरे, जे. के. कडलग तालुका कृषी अधिकारी, व्हि. के. मकपल्ले मंडल कृषी अधिकारी, अहेरी येथील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments