रोटावेटरमध्ये सापडल्याने शेतकऱ्याचे दोन्ही पाय निकामी ; राजूरा तालूक्यातील घटना


कोरपना

शेतात ट्रक्टरने रोटावेटर सूरु होते.चालकाचा मागील बाजूनी बसून असलेल्या शेतकर्याचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये सापडल्याने गंभीर दूखापत झाली. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्यापेक्षा अधिक कटले आहे. ही दूदैवी घटना राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे घडली. मोहन पिंगे असे अपघातग्रस्त शेतकर्याचे नाव आहे. ही घटना आज ( शनिवार ) पहाटेचा सूमारास घडली.उपचारासाठी जखमी शेतकर्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

राजूरा तालूक्यात येणाऱ्या कोहपरा या गावातील  शेतकरी मोहन पिंगे यांनी शेतात नांगरणीचा कामाला सूरवात केली होती.आज ( शनिवार ) पहाटेपासून  शेतात ट्रक्टरने रोटावेटर करणे सूरु होते. ट्रक्टर चालकाचा मागील बाजूस मोहन पिंगे बसले होते. दरम्यान रोटावेटर मध्ये काहीतरी अडकले अन ट्रक्टरला धक्का बसला. या धक्याने मोहन पिंगे खाली घसरले .त्यांचे दोन्ही पाय रोटावेटर मध्ये अडकले. दोन्ही पायाचे तळवे अध्यापेक्षा अधिक कापल्या गेले. याची माहीती गावकर्यांना होताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 108 रुग्णवाहीकेला बोलाविण्यात आले. पिंगे यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ऐण शेतीचा हंगामात दोन्ही पाय निकामी झाल्याने कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर