वर्धा नदीत दहा किलोचे मासे: लॉकडाऊनमध्ये पाणी झाले शुध्द


राजुरा

 कोरोना विषाणूमुळे भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व शहरातील दैनंदिन जीवनावर परिणाम होऊन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असला तरी पर्यावरणावर त्याचा सकारात्मक बदल झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात राजुरा शहाराजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीतील प्रदूषणात घट झाली आहे हे नदीपात्रात कधीं न दिसणारे दहा दहा किलोचे मासे दिसत असल्याने स्पष्ट होत आहे

राजुरा शहरापासून बारमाही वाहणारी जीवनदायिनी वर्धा नदी यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नदीपात्रात पाणी आहे मात्र दरवर्षी बल्लारपूर पेपर मिल येथील कंपनीतून येणाऱ्या विषारी सांडपाण्यामुळे नदीपात्रातील पाण्यात असलेल्या जलचर प्राण्यांची वाढ होत नसल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत होता. यामुळेच जलचर प्राणी परिसरातील नदीपात्रात फार कमी प्रमाणात दिसत होते. याच बरोबर (मॉल्स्, सुपर मार्केट्स), शहरातील लघु उद्योग, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, गॅरेज, खाजगी कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंटस यातील होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पाण्यातील प्रदूषणाचीे ही घट दिसून आली.
यामुळे राजुरा, चुनाळा, चनाखा परिसरातील नदीपात्रात कधी न दिसणारे दहा दहा किलो वजनाचे मासे मागील दीड महिन्याच्या लॉकडाऊन काळात दिसून आले.

ध्वनी प्रदूषणातही घट

शहरातील निवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रात लॉकडाऊन पूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या डेसिबल पर्यंत ध्वनी ऐकायला मिळत होता त्यानंतर मात्र लॉकडाऊन दरम्यान ध्वनी प्रदूषण, रस्त्यावरील वाहतूकीची वर्दळ (दुचाकी, चारचाकी, आदी), एकूण व्यावसायिक व रहिवासी भागांतील गर्दी यामुळे होणारा आवाज कमी झाल्याने ध्वनी पातळी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर