चंद्रपूरातील पहील्या कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्हचंद्रपूर : जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाच्या 16 व 17 मे रोजी कोरोनासंदर्भातील दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. चंद्रपूर शहरातील कृष्णनगर परिसरात हा रुग्ण 1 मे रोजीच्या स्वॅब तपासणीत पॉझिटिव्ह ठरला होता. सध्या हा रुग्ण नागपूर येथे कोवीडशिवाय अन्य आजारासाठी वैद्यकीय उपचार घेत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण आता कोरोनामुक्त झाला आहे.

Post a Comment

0 Comments