ग्रामपंचायतेचा गाळ्यांचा गोदामासाठी वापरधाबा

गरीब लघू व्यावसायिकांसाठी बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा वापर चक्क गोदामासाठी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीकडे स्वताचा मालकीचे दूकान आहे त्याही व्यक्तीला गाळे देण्यात आले आहे. या गाळ्यांचा वापर सिमेंटचा गोदामासाठी करण्यात आले आहे. समाजसेवेचा तोरा मिरविणार्यांनीच जवळचा व्यक्तीला गाळे देवून त्यावर ठाण मांडून बसले आहे.

संतनगरी अशी ओळख असलेल्या शिवाजी चौकात ग्रामपंचायतेने गाळ्यांची निर्मिती केली. चौकात असलेल्या लघू व्यावसायिकांना दूकानासाठी गाळे देणे बंधनकारक होते. मात्र तत्कालीन सरपंच सांगडे यांनी जवळचा व्यक्तींना गाळे वाटप केले. ज्यांचाकडे स्वताचा मालकीचे पक्या इमारतीत दूकान आहे त्यांनाही गाळे देण्यात आले आहे. आज या गाळ्यांचा वापर ग्रामपंचायत सदस्य गोदामासाठी करीत आहे. गरीब लघू व्यावसायिक जाब विचारायला गेल्यास हा  भांडखोर सदस्य अंगावर धावून जात असल्याची चर्चा गावात आहे. समाजसेवेचा आव आनणार्यांची गरीब  लघू व्यावसायिंकाचा तोंडचा घास हीरावला आहे. गाळ्यांचा गोदामासाठी वापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान अश्या व्यक्तीकडील गाळे काढून घेण्याची मागणी आता पुढे येत आहे

बहूतांश गाळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा नावावर

ज्यांना गाळे देण्यात आलेले आहेत. ते  बहूतांश काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांचे स्वताचे दूकान गाळ्यात नाही. या गाळ्यांचा वापर तो ग्रामपंचायत सदस्य सिमेंट,बांधकाम साहीत्य ठेवण्यासाठी करित आहे.

Post a Comment

0 Comments