राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत गोंडपिपरीचा भूमिपुत्र सुरज दहागावकर प्रथम

गोंडपिपरी

देशातील कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात राजष्री शाहू महाराजांचे सामाजिक योगदान या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत महाविद्यालयीन गटात चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयांत बीए अंतिम वर्षाला शिकत असलेला सुरज पी. दहागावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
 सुरज हा नवोदित कवी असून त्याच्या अनेक कविता, लेख महाराष्ट्राच्या विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या असून गोंडपीपरी तालुक्यातील मूळचा सकमुर येथील रहिवासी आहे. सुरज हा प्रामुख्याने सामाजिक विषयांवर लिखाण करत असून सोबतच त्याने राजष्री शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे सतत ५० दिवस ५० लेख लिहले आहेत.
              हे वर्ष लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून ०१ ऑगस्ट ला सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे अशी माहिती समितीचे निमंत्रक यशवंत मकरंद, प्रा. डॉ. सुरेश शेळके, सुरेश हिवाळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments