धनिकांचा ताब्यातील गाळे परत घ्या ; गरीब लघू व्यावसायिकांना द्या;राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदनगोंडपिपरी

गरीब लघू व्यावसायिक ,बेरोजगारांसाठी बांधण्यात आलेले गाळे धनिकांचा ताब्यात आहेत.या गाळ्यांचा वापर चक्क गोदामासाठी सूरु आहे. धनिकाकडील गाळे परत घेऊन गरीब लघू व्यावसायिकांना देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंपिपरी सोशल मिडीया तालूका अध्यक्ष आशिष मुंजनकर यांनी ग्रामपंचायतेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावातील  शिवाजी चौकात ग्रामपंचायतेने गाळ्यांची निर्मिती केली. चौकात असलेल्या लघू व्यावसायिकांना दूकानासाठी गाळे देणे बंधनकारक होते. मात्र  गाळे वाटप करतांना गरीब लघू व्यावसायिक,बेरोजगारांना  डावण्यात आले.नियमांना बगल देऊन धनिकांना,गावनेत्यांना गाळे वाटप केल्या गेले.  ज्यांचाकडे स्वताचा मालकीचे पक्या इमारतीत दूकान आहे त्यांनाही गाळे देण्यात आले आहे. आज या गाळ्यांचा वापर ग्रामपंचायत सदस्य गोदामासाठी करीत आहे. दरम्यान धनिकांचा ताब्यातील गाळे काढून घ्यावे अन गरीब लघू व्यावसायिकांना गाळे देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंडपिपरी सोशल मिडीया अध्यक्ष आशिष मुंजनकर यांनी केले आहे. त्या संदर्भातील निवेदन ग्रामपंचायतेला दिले आहे.

Post a Comment

0 Comments