विदुत विभागाने दुरुस्तीची कामे तातडीने करावीत ;आमदार सुभाष धोटे यांच्या वीज वितरण विभागाला सूचना


राजुरा 

 आज दिनांक २७ मे २०२० रोजी विश्राम गृह राजुरा येथे वीज वितरण विभागाची बैठक पार पडली राजुरा ग्रामीण भागातील व शहरी भागातील वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा याची दुरुस्ती करणे, राजुरा शहरातील जुने विदूत पोल बदलने, काही परिसरातील सिंगल फेज चे थ्री फेस मध्ये परावर्तीत करणे, ट्रान्सफार्मर ची संख्या वाढविणे, ट्रान्सफार्मर ची क्षमता वाढविणे, आझाद चौक राजुरा येथील ट्रान्सफार्मर चे काम तातडीने करणे, शहरातील विदुत वाहिन्यांचे मेंटेनन्स तातडीने पूर्ण करणे, शहरी विभागाचे कार्यालय राजुरा येथे तातडीने स्थलांतर करण्यात यावे अश्या सूचना आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागाला दिल्या.                         
          या प्रसंगी राजुरा शहराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, नगर सेवक हरजीत सिंघ संधू, गजानन भटारकर, राधेश्याम अडानिया, वीज वितरण विभागाचे अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता श्री. वैद्य, राजूराचे उप अभियंता श्री. लोहे, सहाय्यक अभियंता श्री. ठाकरे, श्री. मक्कासुरे यासह साईनाथ बतकमवार, सय्यद साबीर, मतीन क़ुरेशी, निशाद बेग, मांडू क़ुरेशी, आजीज बेग, हसन भाई, विजय लेखाराजनी, रवी बानकर, इम्रान भाई इत्यादी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments