पाच लाखांची दारु जप्त ; कोरपना पोलीसांची कार्यवाहीकोरपना

कोरपना तालूक्यात येणाऱ्या वनसडी येथील एका घरातून पाच लाख 56 हजाराचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. कार्यवाहीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

वनसडी येथील एका घरात दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त  स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहीतीचा आधाराने पोलीसांनी आज ( गुरुवार ) धाड टाकली असता घरात मोठ्या प्रमाणात दारुसाठा  आढळून आला. या कार्यवाहीत पाच लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपी फरार  झाले आहेत.
सदर कार्यवाही गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर भोयर, प्रकाश बल्की, सतीश बगमारे, मिलिंद जांभुळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments