नारंडा येथील शेतकर्‍यांच्या पांदन रस्त्याची समस्या मार्गी लागणार


आमदार सुभाष धोटेंनी केली नालाखोलीकरण कामाची पाहणी.

राजुरा

 नारंडा येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार शेतकऱ्यांची समस्या प्रत्यक्षात बघण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी प्रत्यक्ष शेत शिवारातील नालाखोलीकरणामुळे बंद झालेल्या पांदन रस्त्याची आज पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्याशी चर्चा केली. नालाखोलीकरण कामामुळे अडचणीत सापडलेला पांदन रस्ता जाण्यायेण्याकरिता मोकळा करून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
           या प्रसंगी प्रदीप मालेकर, शामभाऊ रणदिवे माजी सभापती कोरपना, उत्तमराव पेचे, सुरेश पाटील मालेकर, भाऊजी पोटदुखे, मारोती लोखंडे, पुरषोत्तम शेंडे, सुनील काळे, मोहन चौधरी, साईनाथ मोहुर्ले, मारोती मोहुर्ले,बालाजी वाड्गुरे, प्रकाश मोहुर्ले, बंडु पेटकर, विठ्ठल लेनगुरे, अरुण सोनपितरे, राहुल लोखंडे तालुका कृषी अधिकारी श्री. डमाळे, विभागीय कृषी अधिकारी श्री. योगेश केलकर, संभाजीपाटील कोवे, इ. उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments