कमलापूर परिसरात आढळले नक्षली बॅनर


    22 मे पर्यंत बंद पाळण्याचे नक्षलवाद्यांचे अहवाहन.

गडचिरोली

जिल्ह्यात सध्या नक्षल्यांचा धुमाकूळ सुरू असून धानोरा तालुक्यात चार वाहनांची जाळपोळ केल्यानंतर आज पहाटे पुन्हा कमलापूर येथील मुख्य चौकात नक्षली बॅनर आढळून आले.यामध्ये 22 मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे फर्मान सोडले आहे.यामुळे कमलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
    नुकतेच भामरागड तालुक्यात झालेल्या  चकमकीत गडचिरोली पोलीस दलातील दोन वीर जवान शहीद झाले.त्यानंतर धानोरा तालुक्यात नक्षल्यांनी चार वाहनांची जाळपोळ करून रस्ता अडविले.
    काल मध्यरात्री कमलापूर येथील मुख्य चौकात बॅनर बांधून पत्रके टाकून 22 मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे फर्मान सोडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यात सध्या नक्षल्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments