" त्या " शेतकर्याची मृत्यूशी झूंज अखेर संपली ;रोटावेटरमध्ये सापडलेल्या मोहन मृत्यू


राजूरा

शेतात ट्रक्टरने नांगरणी करतांना रोटावेटर पाय सापडून गंभीर जखमी झालेल्या मोहन पिंगे या शेतकर्याचा अखेर मृत्यू झाला आहे. मोहनचा मृत्यूची बातमी मिळताच गावात शोककळा पसरली आहे. मोहनचा अवेळी जाण्याने कुटूंबावर दूखाचा डोंगर कोसळला आहे.

  राजूरा तालूक्यातील कोहपरा या गावातील शेतकरी मोहन पिंगे यांनी नेहमीप्रमाणे शेतात रोटावेटर करण्यासाठी ट्रॅक्टर लावले. रोटावेटर करतेवेळी मोहन हा चालकाच्या मागे बसून होता.अचानक मोहन खाली घसरला अन त्याचे दोन्ही पाय  रोटावेटरमध्ये सापडले.  दोन्ही पायाचे तळवे अर्ध्यापेक्षा अधिक कापल्या गेले होते. छाती व पोटालाही दूखापत झाली होती. ही दूदैवी घटना
 राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे 16 मे ला घडली. उपचारासाठी मोहनला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.खाजगी रुग्णालयातही उपचार सूरु होता. मागील पंधरा दिवसापासून उपचार घेत असलेल्या मोहन पिंगे यांनी आज  ( शुक्रवार )  पहाटे ५ वाजता जगाचा निरोप घेतला. घरातील कर्ता मुलगाच गेल्याने पिंगे कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Post a Comment

0 Comments