दूचाकीचा धडकेत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

चिमूर

दूचाकीचा धडकेत मार्निगवॉकला गेलेली एका अंगणावाडी सेविकेचा मृत्यू झाल्याची घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. सुर्यकांता अशोक लहाने (५२) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकी चालक धीरज मालके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकरपूर येथे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका सुर्यकांता लहाने या आज सकाळी मार्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या त्यादरम्यान डोमाकडून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीने लहाने यांना जोराची धडक दिली. या अपघातामध्ये लहाने या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर लहाने यांच्या नातेवाईकांनी लहाने यांना शंकरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी लहाने यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच लहाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी दुचाकी चालक धीरज मालके विरूद्ध कलम 279,304 (अ)अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास शंकरपूर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जांभळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल लोटकर करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर