" माती " खाणार्यांचा जिल्हा...!

                      छायाचित्र ; इंटरनेटवरुन साभार

कोरोनाचे महासंकट देश्यावर घोंगावत आहे.देश्यात टाळेबंदी सूरु आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन,प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सूरु आहेत. ग्रीन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन, जिल्हावाशीय चिंतेत आहेत. सध्या समाजमाध्यमातून ही चिंता सामान्य माणूस व्यक्त करतांना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असतांना कोरोनाचा सोबतीला पुन्हा एका विषयाची चर्चा रंगली आहे.ती आहे " माती " ची. टाळेबंदीत तस्करांनी पाय पसरले आहेत. कोरोनाचा उपाययोजनात पोलीस विभाग व्यस्थ आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना अधिकच उत आला आहे. अश्यात तस्करांना बेड्या घालण्यात आता राजकीय नेतेही सरसावले आहेत त्यामुळे पोलीस विभागाचा भार थोळा कमी झालेला आहे. राजकीय नेत्यांना ही " सूदबूध्दी " का सूचली असावी ? हा शोधाचा विषय आहे.

आपला विषय माती खाणार्यांचा आहे. " माती " खाणार्यांची येथे कमतरता नाही. प्रत्येक माणूस खातो. कुणी उजेडात तर कुणी अंधारात खातो. काहीचं प्रमाण कमी असतो,काहीच अधिक असतो,ऐवढाच काय तो फरक.कुणी टेबला खालून खातो,कुणी भर चौकात खातो.  माती खाणार्यांनी कुणालाच सोडलं नाही.अधिकार्यांचा अंगावर ट्रक्टर घेऊन गेलेत. मारहाणीचा घटनाही घडल्या. तर " थेट " घाटावर जावून वृत्तांकन करणाऱ्या आम्हचा पत्रकार बंधूना मातीत लोढवून,त्यांचावर उरावरही बसले. ऐवढेच नाही तर एका महीला पत्रकाराचा जिव घेण्याचा प्रयत्नही केला होता,अश्या बातम्या न्यूज पोर्टला मध्यंतरी झळकल्या होत्या. या घटने नंतरही बिचाऱ्या पोर्टलचा पत्रकारांना बातमी छापली म्हणून  पुन्हा मार खावा लागला. या सार्या घटना बघून कायद्याचे राज्य संपुष्टात आले तर नाही ना..! अशी शंका वाढीस लागली आहे. वारंवार बातम्या येत असतांनाही महसूल आणि पोलीस विभागाचे दूर्लक्ष झाले. पहाटेचा अधूंक अंधारात माती भरुन धावणारी ट्रक्टर पलटली अन दोन मजूरांना जिव गमवावा लागला. मात्र अद्यापही प्रशासनाचे डोळे उघळले नाही.मातीचा विषय अधिक गंभीर होत चालला आहे.

सध्या मातीला सोन्याचा भाव आहे. दिवसभरात लाखोंची उलाढाल रेती घाटावर होते. सध्या वाळू उपसा करण्याचा परवाना नाही. त्यामुळे नफा दोन पटीने वाढला. परिणामी माती खाणार्यांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यातील एकही तालूका माती खाणार्यांनी सोडलेला नाही. मात्र सर्वाधिक चर्चा कोरपना तालूक्याची सूरु आहे. नित्यनेमाने मातीचा एक दोन बातम्या तालूक्यातून झळकत असतात. ही स्थिती प्रत्येकच तालूक्यातील.
मातीची अवैधरीत्या होणाऱ्या  तस्करीमुळे शासनाचा करोडोचा महसूल बुढत आहे. शासनाचा महसूलाची सर्वाधिक चिंता आम्हा पत्रकारांना लागली आहे. जिव धोक्यात घालून आम्हचे पत्रकार बांधव वृत्तांकन करित आहे. मात्र प्रशासनाला आम्हची तळमळ अद्याप कळलेली नाही. अधिकारी पत्रकारांकडे संशयी नजरेने बघतात,ही केवढी शोकांतीका ? हा ही शोधाचा विषय...! भविष्यात कुणीनाकुणी शोधग्रंथ प्रकाशित करेल अशी आशा बाडगण्यास हरकत नसावी...!

कोरोना विषाणू सूवर्ण संधी घेऊन आला असे ज्यांना वाटत आहेत,ते गफलतीत आहेत असे मला वाटते. टाळेबंदी संधी होवू शकत नाही. टाळेबंदी जवाबदारी आहे,याचे भान माती खाणार्यांनी आणि खाणार्यांचा मागे धावणार्यांनीही बाडगायला हवे. कोरोनाने अनेकांना गिळले आहे.आता तर जिल्हाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या बारावर गेली. जे सूजान आहेत त्यांनी संकटाची तिव्रता ओळखायला हवी. सध्या लढा कोरोनाशी आहे यावर फोकस करायला हवा.या लढ्यात प्रत्येकानीच सैनिकाची भुमिका बजवायची आहे.

Post a Comment

0 Comments