आरोग्य केंद्राच्या इमारतीत अवैध खत साठा;जिवती तालूक्यातील प्रकार;तहसीलदारांची धडक कारवाई


जिवती

रासायनिक खताचा अवैध साठा चक्क आरोग्य विभागाचा नवनिर्मित इमारतीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अति दूर्गम अशी ओळख असलेल्या जिवती तालूक्यात हा प्रकार घडला आहे. तहसिलदारांनी टाकलेल्या धाडेत 1300 खताचा बॕगा जप्त करण्यात आल्या.अवैध धंद्यासाठी आता शासकीय इमारतीचा वापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

खरीप हंगामाला सूरवात झाली आहे तसे खत,बियाणाची तस्करी करणारे सक्रिय झाले. खते,बियाणाचा काळाबाजार टाळण्यासाठी शासन थेट शेतकर्‍यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत.  दुसरीकडे मात्र खताचा अवैध साठ्याची साठवणूक चक्क शासकीय इमारतीत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पूढे आला आहे. जिवती तालूक्यातील शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० रासायनिक खताचा बॕगा आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविल्या गेले होते. याची गुप्त माहिती मिळताच जिवतीचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी धाड टाकून खतसाठा ताब्यात घेतला. दरम्यान तहसीलदारांचा कारवाईने कृषी केंद्रचालक धास्तावले आहेत.


लॉकडाऊनमुळे बांधकामास भेट दिली नाही

 लाॅकडाऊनमुळे शेणगाव आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून बांधकामास भेट दिली नाही. शासकीय  इमारतीत अवैध रासायनिक खत साठविणे चुकीचे आहे. कंत्राटदार एजन्सीने कोणाच्या परवानगीने इमारत दिली हे बघावे लागेल. 

राजकुमार गेडाम
  शाखा अभियंता, जिवती

शेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये अवैध रासायनिक खत साठविल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पंचनामा करून खतसाठा सील केला आहे. या संबंधाने शिव कृषी केंद्र चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीअंती दोषीवर कार्यवाही केल्या जाईल.

-प्रशांत बेडसे पाटील 
  तहसीलदार, जिवती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर