आमदाराची कोविड-१९ संदर्भात ग्राम पंचायत पाठन येथे बैटक घेण्यात आले


   सिताराम मडावी/पाटण

   जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत पाठन येथे ग्राम पंचायत कार्यालयात कर्तव्यदक्ष आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ संदर्भात बैटक घेण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत पठाण येथे मा. आमदारांनी वैद्यकिय सोयीसुविधाबाबत तसेच ग्रामीण भागातील कर्ज माफी झालेल्या शेतकर्यांना पुन्हा कर्ज देण्यात यावे, अशी सूचना बँक व्यवस्थापक यांना दिली. पाठन येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. शर्मा यांना  नाईक नगर (तांडा) व इतरही गावांमध्ये जाऊन लोकांच्या आरोग्य तपासणीचे आदेश देण्यात आले. 

याप्रसंगी अंजनाताई पवार सभापती, डॉ. ओमप्रकाश रामावत संवर्ग विकास अधिकारी, भीमराव पाटील मडावी माजी जि.प. सदस्य, वैध्यकीय अधिकारी डॉ. कविता शर्मा, ग्राम सेवक, पाठन येथील स्टेट बँक आफ इंडियाचे व्यवस्यापक, सिताराम मडावी  माजी, सरपंच पाठन, भीमराव पवार, चिनू पाटील कोटनाके, फक्रु नैताम, भीमराव मेश्राम, एकरू पाटील राठोड, वासुदेव गेडाम, आनंदराव जाधव तसेच ग्राम सेवक, रोजगार सेवक इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments