कर्जमाफी यादीत घोळ : आबिद अली यांचा आरोप


कोरपना


राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना दोन लाख पर्यंत करण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिला. राष्ट्रीयकृत बँकेने थकीत कर्जदारांना ठाकरे सरकारच्या घोषणेनुसार पात्र लोकांच्या गाव निहाय दोन लाख पर्यंतचा कर्जमाफीच्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून नव्याने पुढील हंगामासाठी कर्जपुरवठा करण्यास सुरुवात केली. मात्र ज्या लोकांची नावे कर्जमाफी यादी मध्ये आली नाही अश्या शेतकऱ्यांना  सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो . थकबाकीदार कर्जदार सभासद कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे. म्हणून अनेक सभासदांनी आधार लिंक करून कर्जमाफी यादी मध्ये नाव समाविष्ट नसल्याच्या अनेक तक्रारी केल्या. छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी सन्मान योजना व नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. शासनाने टप्प्याटप्प्याने मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल असे जाहीर केले. मात्र संस्थानिहाय 60 ते 65 टक्के शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी यादीत आली मात्र अनेक शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये नावे समाविष्ट नसल्याने निराशा झाली आहे. सन 2016- 17 हंगामातील अतिवृष्टी 2017-18 दुष्काळग्रस्त व 50 टक्के आणेवारी च्या आत असलेल्या गावातील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकझाल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन कर्जमाफी तक्रार मान्य अमान्य नोंदी दाखल करता आल्या नाही त्यामुळे अनेक शेतकरी आपली कर्जमाफीची कैफियत ऑनलाइन दाखल करू शकले नाही व त्यानंतर ही साईट बंद असल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून ठरले नुकतीच प्रशासनाकडून थकित कर्ज वसुली करू नये असे निर्देश दिले मात्र कर्जमाफी पात्र असताना नवीन कर्जापासून शेतकरी वंचित होणार आहे व पुढील हंगाम लगबग सुरू झाल्याने शेतकरी अनेक अडचणीत असताना नवीन कर्ज घेण्यात घोडे अडले याचे काय शेतकरी अडचणीत असून कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना ऑफलाइन माहिती प्राप्त करून दोन लाख पर्यंतचे कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादी मध्ये मूळ कर्जाच्या 30 टक्के किंवा पन्नास टक्के कर्ज माफ झाल्याने उर्वरित रक्कम भरण्याचा सल्ला सहकारी संस्था देत आहे दोन लाखाच्या आत मूळ रक्कम असताना संपूर्ण लाभ का नाही यामुळे शेतकऱ्यांची तळ्यात मळ्यात अशी अवस्था झाली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जमाफी पासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांना नवीन हंगामात कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यादीचा घोड संपुष्टात आणून कर्जमाफी निकषात व धोरण ठरले असताना अत्यल्प कर्जमाफ नोंदी घेण्यामागील चूक कोणाची दोन लाख पर्यंत कर्जमाफी लाभापासून वंचित ठेवण्याचे कारण काय सभासदांच्या कर्ज थकबाकी संबंधी संपूर्ण नोंदी असताना दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मध्ये समाविष्ट शेतकऱ्यांचा न झाल्याने वंचित शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घ्यावा पुढील हंगामात शेतकरी कर्ज घेण्यापासून वंचित राहणार नाही याकरिता जिल्हाधिकारी व जिला मध्यवर्ती सहकारी बँक व्यवस्थापक यांनी वंचित असलेल्या शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही व त्यांना पुढील हंगामाला कर्ज उपलब्ध होईल यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली विनोद नवले संजय सिडाम किशोर सातपूते यांनी केली आहे

Post a Comment

1 Comments

  1. बरोबर आहे साहेब, दोन लाखाच्या वरील शेतकरी सुद्धा संभ्रमात आहेत, दोन लाखाच्या वरील रक्कम भरून कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला होता परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे मा जिल्हाधिकारी साहेबांनी यावर लवकर तोडगा काढला पाहिजे, नाहीतर शेतकरी खूप आर्थिक अडचणीत येतील

    ReplyDelete