राजुरा नगर परिषदेला वन स्टार मानांकनस्वच्छ भारत मिशन अंतर्गत पडताळणीत नागपूर विभागात प्रथम १० क्रमांकात राजुराने मारली बाजी.


राजुरा (ता.प्र) :--  शहरी विकास मंत्रालयातर्फे स्वच्छ शहरांना दिल्या जाणार्‍या मानांकनामध्ये राजुरा शहराने वन स्टार मानांकन प्राप्त केले असून, नागपूर विभागात प्रथम १० क्रमांकात राजुरा नगर परिषदेने बाजी मारली आहे.
        स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पडताळणी करण्यात आलेल्या देशभरातील कचरामुक्त शहरांमध्ये राजुरा नगर परिषदेचा वन स्टार मानांकन मध्ये समावेश करण्यात आला आहे. यात १ हजार ४३५ शहरांनी भाग घेतला होता. यापैकी देशभरातील १४१ शहरांना मानांकनात स्थान मिळाले आहे. यात ७६ शहरे ही महाराष्ट्रातील आहेत हे विशेष.
      घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता दोन वेगवेगळ्या मापदंडांवर प्रत्येक शहराला गुण देण्यात आले होते. लहान तसेच मोठी शहरे यांना अधिक राहण्यायोग्य बनविणे व स्वच्छतेबाबत उच्च मानांकन प्राप्त करण्यास त्यांच्यात निकोप स्पर्धा व्हावी, या दृष्टीने नगर विकास मंत्रालयाने जानेवारी २०१८ मध्ये ‘स्टार रेटिंग प्रोटोकॉल’ सुरु केले. यातील निकषांनुसार केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांनी कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेची शहरनिहाय तपासणी केली. ही प्रणाली कार्यक्षम आहे की नाही हे समजण्यास शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या.कचरामुक्त शहराचे मानांकन यादित देशभरातील १४१ शहरात राजुरा शहराने स्थान मिळविल्याने शहराचा प्रथम नागरिक म्हणून आनंद होत आहे. याद्वारे सर्व न प कर्मचारी व पदाधिकारी तसेच सर्व शहरवासीयांचे  विशेष अभिनंदन करतो. सोबतच पुढील वर्षी शहरात ३ स्टार मानांकन प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत.

अरुण धोटे ,नगराध्यक्ष

         कचरामुक्त शहराचे यादित राजुरा नगर परिषदेने स्थान प्राप्त केल्याने आनंद झाला. त्याबद्दल राजुरा शहराचे अभिनंदन. यात सातत्य टिकवून ठेवणे व पुढील वर्षी उच्च मानांकन प्राप्त करण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

अर्शीया जुही , मुख्यधिकारी


Post a Comment

1 Comments

  1. अभिनंदन, राजूरा नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,नगरसेवक

    ReplyDelete