आमदार पोहचले रोजगार हमीचा कामावर;मजूरांशी साधला संवादराजूरा

 टाळेबंदीत कामगार,मजूरांचे मोठे हाल झाले. हाताला काम नसल्याने कुटूंबाचा उदर्निर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. अश्यात शाशनाने आता रोजगार हमी योजनेचा कामांना सूरवात केली आहे. मोठ्या संख्येने मजूर कामावर जात आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी काम सूरु असलेले ठिकाण गाठले.  मजूरांशी संवाद साधला.थेट आमदारच आल्याने अधिकार्यांची मात्र धावाधाव झाली.

 राजूरा तालूक्यातील चिंचोली (बु), कवीठपेठ,नलफडी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत  नाला खोलीकरमाचे काम सूरु आहे. कामावर मोठ्या संख्येने मजूर आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क,सोशल डिस्टन्सचा वापर कामावर सूरु आहे. कामाचा आढावा घेण्यासाठी राजूरा विधानसभेचे आमदार धोटे यांनी थेट कामाचे ठिकाण गाठले. कामाची प्पाहणी केली.मजुरांशी संवाद साधला. त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या सुरक्षितेविषयी आस्थेने विचारपूस केली. आमदार आल्याने अधिकार्यांची मात्र धावाधाव झाली.

Post a Comment

0 Comments