कोरोनाबाधित भागात तैनात पोलिसाची आत्महत्या

यवतमाळ : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून राज्यांतही याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातच यवतमाळ पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (ता.12) रात्री आठच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील शासकीय निवासस्थानी उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

उमरखेड तालुक्यातील जेवली येथील संजय रतीराम साबळे हे काही दिवसांपासून पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर होते. त्यांची ड्यूटी शहरातील कोरोनाबाधित भागातील इंदिरानगर या ठिकाणी होती. मगंळवारी ते पळसवाडी येथे असलेल्या आपल्या शासकीय निवासस्थानी परतले. घरात आल्यानंतर त्यांनी गळफास लावून घेतला.

Post a Comment

0 Comments