गोंडपिपरीत चाळीस हजाराची दारू पकडली


गोंडपिपरी

गोंडपिपरी गणेशपिपरी मार्गावरून दारूची वाहतूक करतांना दोन आरोपींना पकडण्यात आले.त्याच्याकडून त्रेचाळीस हजार रूपयाची दारू व वाहन जप्त करण्यात आले.गोंडपिपरी पोलीसांनी काल दि.13 मे रोजी रात्रीच्या सुमारास हि कार्यवाही केली.
लाँकडाऊन च्या काळात गावातील काही दारूतस्कर सक्रिय झाल्याची कूणकूण पोलीसांना लागली.याचदरम्यान गणेशपिपरी मार्गावरून दोघे जण दारूच्या साठ्याची वाहतूक करित असल्याची माहीती पोलीसाःना मिळाली.यावेळेस पोलीसांनी पाळत ठेवली.
यावेळी दुचाकीवरून गोंडपिपरी येथील कलीम सय्यद व नागेश बद्दलवार हे येतांना आढळून आले.पोलीसांनी त्यांचे वाहनाची तपासणी केली यावेळेस
180 मिली च्या 144 दारूच्या बाटलाचा साठा आढळून आला.
पोलीसांनी 43200 रूपयाची दारू,40000हजार रूपयाचे वाहन,व 1000 रूपये असा एकून 84200 रूपयाचा मुदेदेमाल जप्त करण्यात आला.
आरोपी कलीम सय्यद व नागेश बद्दलवार यांच्याविरूध्द गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात देवेश कटरे,प्रफुल कांबळे,संतोष काकडे,पुनेश्वर कुळमेथे यांनी हि कार्यवाही केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

लोकप्रियता

Call for Website

फॉलोअर