कोरोनामुळे लग्नाचे रूपांतर झाले साक्षगंधातचंद्रपूर


घुग्घुस:- येथील सुभाष नगर मधील दिनकर कोंगरे कुटुंबातील अनूप या मुलाचे विवाह घुग्घुस येथीलच अमराई वॉर्ड निवासी अरुण डाकरे यांची मुलगी अश्विनी हिचा शुभविवाह 24  दिसंबर रोजी दोन्ही कुटुंबाच्या आपसी मंजुरीने 8 में 2020 रोजी आयोजीत करण्यात आले होते.
दोन्ही परिवार घरातील पहिले लग्न असल्यामुळे अत्यंत उत्साहात लग्नाच्या तैयारीला लागले लग्नाचा बस्ता घेण्यात आला.
लग्न स्थळ यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एस.बी मंगल कार्यालय नोंद करण्यात आली त्यांना एडवांस देण्यात आले.
कैटरिंग, बैंड , वाहन आदिची ही बुकिंग करण्यात आली.
लग्न तिथी जवळ आली देशात ताळेबंदी व संचारबंदी,जिल्हाबंदी लागू झाल्यामुळे दोन्ही परिवारतर्फे घुग्घुस पोलीस स्टेशनचे थानेदार राहुल गांगुडे यांची भेट घेवून त्यांना परिस्थितीची माहिती दिली असता त्यांनी सामाजिक अंतराचे पालन करून दोन्ही कुटुंबातील पांच-पांच लोकांनी शामिल व्हावे असे सूचविले असता दोन्ही कुटुंबियाने 08 में रोजी लग्ना ऐवजी साक्षगंध पार पाडण्यात धन्यता मानली.

Post a Comment

0 Comments