जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू ;गडचांदूर येथिल घटनाकोरपना

केबल डिश कनेक्सनचे काम करीत असतांना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गडचांदूर येथे घडली.रंजित पेठकर असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने ऐन पोडा सणाचा दिवशी गडचांदूर शहरात शोककळा पसरली आहे.

कोरपना शहरात येणाऱ्या गडचांदूर शहरातील रंजीत पेटकर  ( वय 32 )  हा युवक केबल डिश कनेक्शनचे काम करीत होता. प्रभाग क्रमांक 1 मधील सावित्रीबाई फुले शाळा समोरील उके यांच्या घराजवळील विद्युत खांबावर  कनेक्शनचे काम करीत असताना विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला. जिवंत विद्युत तारेचा स्पर्शाने त्याला जोरदार धक्का बसला. या धक्याने तो जमिनीवर कोसळला. जमिनीवर कोसळल्याने त्याछि डोक्याला जब्बर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले.मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला  मृत घोषित केले.या घटनेने ऐण सणाचा दिवशी गडचांदूरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments