सिलेंडरचा स्फोटात घर जळाले..

ब्रम्हपुरी

 तालुक्यातील गांगलवाडी येथील सकाळचा सुमारास सिलिंडर स्फोट झाला. या स्फोटात घर जळून राख झाल्याची घटना घडली.
गांगलवाडी येथील रुपेश दिघोरे यांच्या घरी सकाळी आठच्या सुमारास चहा बनवत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने या स्फोटात संपूर्ण घर जळून राख झाले त्यात सुदैवाने कुणालाच काही झाले नाही मात्र रुपेश दिघोरे यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे झालेल्या स्फोटात संपूर्ण घर जळाले असून अन्नधान्य पैसा, कपडे, घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असल्याने कुटुंब संपूर्णता उघड्यावर पडले आहे शासनाने त्वरित मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments