पक्ष संघटनेत नव्या चेहर्‍यांना संधी देणार - आ. सुभाष धोटे



काँग्रेस व युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षांची निवड

गडचांदूर

कोणत्याही निवडणुका जिंकायच्या झाल्यास पक्षसंघटन अतिशय महत्त्वाचे आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालणारा पक्ष असून तळागाळातील कार्यकर्ते पक्षात जुळलेले आहे. पक्षसंघटनेत व विविध शासकीय, अशासकीय समित्यांवर ज्येष्ठांसोबतच नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
        गडचांदूर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या छोटेखानी बैठकीत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी मंचावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष ललिता गेडाम, पंचायत समिती सभापती रुपाली तोडासे, उपसभापती सिंधुताई आस्वले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पापय्या पोन्नमवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, गटनेता विक्रम येरणे, माजी विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, नामदेव येरणे, धनंजय गोरे यांचेसह काँग्रेसचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
        गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संतोष महाडोळे यांची नियुक्ती करण्यात आली तर गडचांदूर युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी रुपेश चुधरी यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शैलेश लोखंडे व आशिष वांढरे यांनी केले तर आभार गटनेता विक्रम येरणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments