पृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह

वॉशिंग्टन : अंतराळातील गूढ उकलण्यासाठी जगभरातील देश सातत्याने अवकाशात कृत्रिम उपग्रह पाठवत असतात. मात्र, काही काळानंतर हेच उपग्रह अवकाशातील महत्त्वाची माहिती पुरवत एक तर नष्ट अथवा निष्क्रिय होतात. त्यानंतर ते अवकाशातच फिरत राहतात; मात्र काही उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळतात. अशीच एक घटना रविवारी रात्री व सोमवारी पहाटेच्या सुमारास घडणार आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 56 वर्षांपूर्वी सोडण्यात आलेला एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर कोसळणार आहे. या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच तेथे काही बदल घडलेले दिसून येतील. या सॅटेलाईटचे नाव 'ऑर्बिटिंग जियोफिजिक्स ऑब्झर्व्हेटरी 1' (ओजीओ-1) असे आहे.

नासाने 'ओजीओ-1' या कृत्रिम उपग्रहाला सप्टेंबर 1964 मध्ये प्रक्षेपित केले होते. या उपग्रहाचे काम म्हणजे पृथ्वीच्या मॅग्नेनिक वातावरणाचा तसेच पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतक्रियेचा अभ्यास करणे. 'ओजीओ-1' सुमारे पाच वर्षांपर्यंत आकडेवारी उपलब्ध करून दिली. त्यानंतर त्याला 1971 मध्ये अधिकृतपणे बंद करण्यात आले. तेव्हापासून 'ओजीओ-1' हा पृथ्वीभोवती चकरा मारत आहे.

https://www.batmidar.xyz/2020/08/3-50.html 'ओजीओ-1'चे वजन सुमारे 487 किलो इतके आहे. सध्या हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरत आहे. नासाच्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे 2 वाजून 40 मिनिटांनी हा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि तो नष्ट होईल. त्याचे तुकडे पॅसिफिक महासागरातील ताहिती व कूक या बेटावर पडण्याचा अंदाज आहे.

साभार-मिडीया वाॕच

Post a Comment

0 Comments