विवाहीत प्रेयसीला रात्री भेटायला जाणे प्रियकराचा आले अंगलट ; सासरच्यानी केली बेदम मारहाणबिहार

  विवाहित प्रेयसीला रात्रीचे भेटायला जाणे एका तरुणाच्या भलतेच अंगलट आले आहे. तिच्या सासर्‍याने त्याला रंगेहात पकडल्याने विवस्त्र करून बेदम मारहाण केली आहे., बिहारच्या गोपालगंज येथे ही घटना घडली. गोपालगंज येथील मुर्गिया नावाच्या गावात ही महिला राहते.

रात्रीच्या वेळी तिला भेटण्यासाठी हा प्रियकर तिच्या घरी गेला होता. महिलेवर आधीच संशय आल्याने सासरच्या मंडळींनी तिच्यावर पाळत ठेवली होती. रात्री प्रियकर तिच्या खोलीत शिरल्याची चाहुल लागताच सासरकडची मंडळी सावध झाली. त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडले.त्यांनी तरुणाला खेचत घराबाहेर काढले. त्यानंतर महिलेच्या सासर्‍याने त्याचे कपडे उतरवत बेदम मारहाण सुरू केली.

हा आवाज ऐकून शेजारीपाजारी लोक गोळा झाले. त्यांना हा प्रकार कळताच त्यांनीही त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केली. त्याच्या पायात दोरी बांधून त्याला खेचत नेण्यात आले. सुदैवाने तिथे काही ज्येष्ठ ग्रामस्थांनी हा प्रकार थांबवला आणि त्या प्रियकर तरुणाची सुटका केली. या हाणामारीत तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments