आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने राजुरा नगरपरिषदेस ४.९६ कोटी निधी मंजूर.


मंजूर निधीतून शहर सौंदर्यात पडणार विशेष भर.

राजुरा

राजूरा नगरविकास कामांना गती देण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मागणीचा वरीष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर नगर विकास विभाग द्वारा नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत राजुरा नगरपरिषदेस ४.९६ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास  शासनस्तरावरुन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
         यामध्ये राजुरा नगरपरिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकाम, राजुरा नगरातील अंतर्गत  रस्ते बांधकाम, सिमेंट काँक्रीटचे कव्हर नाली, समाजभावन इत्यादी विकास कामे मंजुर करण्यात आले आहेत. या निधीतून राजुरा शहराच्या विकासकामांना गती मिळणार असून शहराच्या सौंदर्यात विशेष भर पडणार आहे.
            राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, राजुरा काँग्रेस कमीटीचे माजी कार्याध्यक्ष साईनाथ बतकमवार याच्या उपस्थित नगर विकास विभागचे शासन निर्णयाचे मंजुर आदेश आमदार सुभाष धोटे यांनी आज बहाल केले. यामुळे राजुरा नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments