गडचिरोली-चंद्रपूरला जोडणारा आष्टी मार्ग बंदगोंडपिपरी :-

काल गोसीखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे सुरू केल्यामुळे आज वैनगंगा नदीची पातळी पूर्णपणे भरली आहे.यामुळे आष्टी पुलावर तब्बल ४ फूट पाणी आले आहे.अश्यातच गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा आष्टी चंद्रपूर मार्ग आता दुसर्यांदा बंद झाला आहे.लागलीच आष्टी आणि गोंडपिपरी पोलिसांनी दुतर्फा आपापल्या पोलिस स्टेशनच्या वतीने नदीवर बॕरिगेट्स लावले असुन प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.


काही दिवसांपुर्वीच राज्यशासनाने लालपरिची विनापास जिल्हांतर्गत वाहतूक सुरु केली.यामुळे बर्याच दिवसांपासून रखडलेली ये-जा सुरु झाली.अश्यातच मात्र काल गोसीखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे सुरू केल्यामुळे आज वैनगंगेला पुर आला,परिणामी हा मार्ग बंद झाला आहे.

Post a Comment

0 Comments