गोंडपिपरी-मूल मार्गावरील पुल पाण्याखाली ; वाहतूक ठप्पगोंडपिपरी

नुकतंच गोसीखुर्द धरणाचे पूर्ण दरवाजे सुरू केल्यामुळे आज वैनगंगा नदीची पातळी पूर्णपणे भरली आहे.त्याच्या मुळे वढोली अंधारी नदीला पूर आला. गोंडपिपरी पोलिस स्टेशनच्या वतीने नदीवर बॕरिगेट्स लावले असुन प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

काही दिवसांपुर्वीच राज्यशासनाने लालपरिची विनापास जिल्हांतर्गत वाहतूक सुरु केली.यामुळे बर्याच दिवसांपासून रखडलेली ये-जा सुरु झाली.अश्यातच मात्र काल गोसीखु र्द धरणाचे पूर्ण दरवाजे सुरू केल्यामुळे आज वैनगंगेला पुर आला,परिणामी वढोली अंधारी नदीचा गोंडपिपरी मूल ला जोडणारा हा मार्ग बंद झाला आहे.शेतामध्ये पाणी शिरल्याने शेकडो हेक्टर शेती संकटात आली आहे.

Post a Comment

0 Comments