कोरोना रूग्णांच्या उपचाराकरीता शासकिय मदत मिळणारी खाजगी रूग्णालये जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्यावी; आमदार धोटे.राजुरा

जिल्ह्यात  (कोव्हीड - 19) कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असुन जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थीती अवाक्याबाहेर जात आहे. कोरोनाची समुह संसर्गाकडे वाटचाल सुरू झाल्यामुळे दररोज रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला असून दिवसेंदिवस कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता नियमित रूग्ण व कोरोना रूग्णावरील उपचाराकरीता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रूग्णालयामधील व्यवस्था कमी पडत असल्याने जिल्ह्यातील रूग्णाची उपचारा अभावी गैरसोय होत आहे. रूग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासाठी जिल्ह्यातील ज्या खाजगी रूग्णालयांना शासकिय मदत अथवा शासकिय जमिनी दिलेल्या आहेत असे सर्व रूग्णालये जिल्हा प्रशासनाने आपल्या ताब्यात घेवून रूग्णांच्या उपचाराकरीता उपयोगात आणावीत अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मा. जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments