रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी योग्यचग्रामस्थांची पत्रपरिषदेत माहिती

  गोंडपिपरी

 गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत गोजोली ग्रामपंचायतला नुकतीच रमाई आवास योजनेअंतर्गत 56 घरकुल पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. ही यादी जाहीर होताच गावातील वासुदेव डोंगरे या ग्रामस्थांनी या यादीवर आक्षेप नोंदवित संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे 25 मंजूर पात्र लाभार्थी हे अपात्र असल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारावर चौकशी अंती सुद्धा ही यादी पात्र करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी हे नियमानुसारच पात्र असून तक्रार कर्त्याने स्वार्थापोटी वाद निर्माण केल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रपरिषदेत केली आहे.
     सन 2018-19 मध्ये गोजोली ग्रामपंचायत कडून रमाई आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी अर्ज मागविले होते. यात 67 कुटुंब प्रमुखांनी अर्ज सादर केले. या अर्जावर ग्रामपंचायत ठरावानुसार 67 नावांपैकी रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये एकूण 56 नावे मंजूर करण्यात आली. ही यादी जाहीर होताच येथील रहिवासी असलेल्या वासुदेव डोंगरे यांनी 56 पैकी 25 लाभार्थी हे अपात्र असल्याचा ठपका ठेवीत नवीन अकरा नावे पात्र करावे. या आशयाचा अर्ज संवर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांना फेर चौकशीसाठी केले.या अर्जावर संबंधित अधिकाऱ्यांनी 25 पात्र लाभार्थ्यांची दोनदा चौकशी केली. चौकशीअंती हे पूर्ण लाभार्थी पुन्हा पात्र ठरले. यानंतरही संबंधित तक्रारदाराचे समाधान न झाल्याने त्यांनी पत्र परिषदेच्या माध्यमातून या प्रकरणाला वृत्तपत्राच्या सहाय्याने प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित प्रकरणावर येथील ग्रामस्थांनी पत्र परिषदेचे आयोजन करून सविस्तर वृत्त परिषदेसमोर मांडले. तक्रारकर्त्याचे नाव हे मंजूर यादीत नसल्याने त्यांनी *'मला नाही तर कुणालाच* *नाही'* या भावनेतून हे प्रकरण हाताळत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून समोर आली. या प्रकरणाबाबत संवर्ग विकास अधिकारी  बुलकुंडे यांच्याशी संपर्क केला असता सदर तक्रारकर्ता चौकशीला सहकार्य करीत नसून, चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे लेखी कळविल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण केली असल्याचे मत व्यक्त केले. रमाई आवास योजनेतील मंजूर पात्र लाभार्थ्यांची यादी ही गावातील सर्वांना मान्य असून फक्त एकच तक्रारकर्ता का? असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यामुळे संबंधित पात्र यादी हीच खरी पात्र असून ही यादी ग्रामपंचायतीच्या ठरवानिशी व संपूर्ण चौकशीनिशी पात्र ठरली आहे. त्यामुळे  तक्रारकर्त्यानी या प्रकरणाबाबत बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे मत राजेश डोंगरे, मुन्ना तावाडे, पायल दुर्गे,अमरदास डोंगरे, दिलीप झाडे,शेखर बोनगिरवार यासह समस्त नागरिकांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले आहे.

 *तक्रारकर्त्यांचे आरोप बिनबुडाचे*

  56 पात्र लाभार्थ्यांपैकी 25 लाभार्थी हे वगळण्यात यावे, यासाठी त्यांनी काही लाभार्थी हे बाहेर वास्तव्यात असतात, तर काहींना पक्के घर असून एकाला शासकीय नोकरी असल्याचे कारण समोर करून त्यांना अपात्र करावे असा आरोप तक्रारकर्त्यानी पत्रपरिषदेत केला होता. याबाबत ग्रामस्थांनी असे सूतोवाच केले की, काही लाभार्थी हे गावात कामधंदा मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी शहराच्या ठिकाणी कामानिमित्त गेले आहेत. मात्र ते सर्व तात्पुरत्या स्वरूपात शहरात राहतात. तर काहीना पक्के घर असल्याचा आरोप देखील चुकीचा असून या योजनेतील निकषाच्या आधारावर कुणाचेही पक्के घर नाही. एकाला शासकीय नोकरी असल्याचा हा सुद्धा आरोप चुकीचा असून तो राज्य परिवहन महामंडळात मानधनावर काम करीत आहे.हे महामंडळ शासकीय नसून निमशासकीय असल्याने हा सुद्धा आरोप खोटा आहे.तक्रारकर्त्यानी केलेले आरोप पुराव्यासह सिद्ध करावे, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांच्या पत्र परिषदेतील माहितीनुसार तक्रारकर्त्यांचे आरोप बिनबुडाचे असून सर्व लाभार्थी या योजनेत पात्र असल्याची भूमिका स्पष्ट केली.

 *कोट.*
     रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी हे ग्रामपंचायतीतील  दस्ताऐवजानुसार पात्र असून,प्रत्यक्ष घरांच्या पाहणी अंती सुद्धा पात्र ठरले आहेत. 
              --   देवानंद गेडाम, सचिव
       ग्रामपंचायत कार्यालय गोजोली,

Post a Comment

0 Comments