पैसे घ्या पण सेवा द्या ;युवकांची पत्रपरिषदेत मागणी;क्रिडासंकूल नावापुरतेचगोंडपिपरी

येथिल शहरालगत असलेले क्रिडासंकूल नावापूरतेच ठरले आहे.या ठिकाणची देखरेख करणारा व्यवस्थापक युवकांकडून पावतीविना बिनदिक्कतपणे वसुली करीत आहे.तरी देखिल मात्र गरजेपोटी "पैशे घ्या पण सेवा द्या" असे धोरण क्रिडासंकुलात जाणाऱ्या युवकांनी पत्करले आहे.आगामी भरत्यांच्या पाश्वभुमिवर शारिरिक तंदुरुस्ती गरजेची असतांना गोंडपिपरी क्रिडासंकुलात अनागोंदी कारभार सुरु आहे.परिणामी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी युवकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

गोंडपिपरी शहरालगत क्रिडासंकुल आहे.यात स्थानिक गोंडपिपरी शहरासह लगतच्या गावखेड्यातून शेकडो युवक व्यायामासाठी येतात.आगामी विविध विभागांच्या भरत्या लक्षात घेता संकुलात व्यायामासाठी येणाऱ्या युवकांचा आकडा दिवासागणिक वाढत आहे.अश्यातच ईकडे मात्र गोंडपिपरी क्रिडासंकुलाची दुरावस्था झाली आहे.संकुलाची सुरक्षा भिंत कोसळली आहे.आवारात गवत,कचर्याचे साम्राज्य उभे आहे.जागोजागी खड्डे पडले असून त्यात पाणि साचले आहे.ऐवढेच नाही तर क्रिडासंकुलातील व्यायामाचे साहित्यही नावालाच उरले आहे.यामुळे साहित्य घरी नेले की,चोरिला गेले ? असा सवाल आता पुढे आला आहे.अश्या एक ना अनेक समस्याचे माहेरघर ठरलेल्या गोंडपिपरी क्रिडासंकुलाच्या व्यवस्थापक असलेल्या राजकुमार भोयरने तर हद्दच पार केली आहे.शहरासह गोंडपिपरी लगतच्या ग्रामिण भागातुन येणाऱ्या युवकांकडून महिण्याकाठी प्रत्येकी ३०० रुपये वसुलिचा सपाटा लावला आहे.पैशे देणार नसाल तर ईथे दिसायचे नाही,असा ईशाराही त्यानी या युवकांना दिला.यावर मात्र आपल्या गरजेपोटी युवकांनी "मेवा घ्या पण सेवा द्या" असे धोरण पत्करले आहे.या संकुलासाठी नेमण्यात आलेले मार्गदर्शक हे एका संस्थेत क्रिडाशिक्षक आहेत.परिणामी वेळेअभावी त्यांचे देखिल येथे येणाऱ्या युवकांना मार्गदर्शन दुर्लभ झाले आहे.एकेकाळी आम्हीच युवकांचे खरे तारणहार आहोत,असे शहरभर डिंडोरा पिटणार्या गोंडपिपरी शहरातील युवा राजकारण्यांनी मात्र यावर कमालीची चुप्पी साधली आहे.लोकप्रतिनिधींचे तर याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे.यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी युवकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.यावेळी मांगणीचे निवेदण जिल्हाधिकारी,जिल्हा क्रिडा अधिकारी,आमदार सुभाष धोटे,गोंडपिपरीचे उपविभागिय अधिकारी,तहसिलदार आदिंना देण्यात आल्याची माहिती यावेळी उपस्थित युवकांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments