शेतशिवारात वाघाच्या "डरकाड्या" : बंदोबस्त करा;अन्यथा आदोलन

गोंडपिपरी

ऐण शेती हंगामातच शेतशीवारात वाघाच्या डरकाड्या घुमू लागल्याने शेतकरी दहशतीत आहेत. बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा निवेदनातून तोहोगाव येथिल गावकर्यांनी दिला आहे. वन्यजीव शेतात धुडघूस घालत असतांना गावातही शिरकाव करू लागले आहेत. चितळाने धडक दिल्याने वटराणा येथिल महीला जखमी झाली होती.आता वाघ शेतशिवारात दिसू लागल्याने गावकरी हादरले आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील बरेच गावे जंगलालागत वसली आहेत. या गावांना वन्यजीवांचा त्रास ठरलेलाच असतो.त्यात शेतशिवारात आता वाघाचा डरकाड्या ऐकू येत असल्याने गावकरी हादरले आहेत.तालुक्यातील तोहोगाव जंगलाने वेढलेलं गाव आहे.या गावातील  दिनकर ठेंगरे हे बांबू आणण्यासाठी जंगलात गेले.त्याच्यावर हल्ला करुण वाघाने त्यांना जागीच ठार केल्याची घटना काही महीण्यापूर्वी घडली होती. या घटनेनंतर तो वाघ अनेकांच्या दृष्टीस आला आहे.परिसरातील गावालगत त्याची भटकंती सुरु  आहे.धान रोवनीचा हंगाम आता आटोपला आहे.अश्यात बळीराजा पिकांतील निंदने,खुरपणे,खत ,डवरणे ईत्यादी कामात व्यस्त आहे.मात्र तोहोगाव परिसरात वाघाचा वावर वाढल्यामुळे शेतकरी वर्गाने भितीपोटी शेतात जाणे बंद केले आहे.शेतशिवारात वाघाचा डरकाड्या ऐकू येत असल्याने गावकरी भयभित झाले आहेत.वनविकास महामंडळाने या वाघाचा बंदोबस्त करावे, अशी मागणी गावकर्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यात विभागाला अपयश आले तर आंदोलन करू असा ईशारा तोहोगाववासीयांनी दिला आहे.यावेळी माजी उपसरपंच फिरोज पठाण,रमेश मोरे,आशिष मोरे,शुभम ठेंगरे,रविंद्र गौरकार आदिंसह गावकर्यांची उपस्थिती होते.तोहोगाव परिसरातील वाघाचे हल्ले रोखण्यासाठी दरम्यानच्या काळात विभागिय वनव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय  समिती गठित करण्यात आली.मात्र ही समीती केवळ देखावा ठरली आहे.

Post a Comment

0 Comments